मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला होता. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्र लिहिलं असून त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. मॉब लिंचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता, किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, असा आरोप करत चंद्रकांत पाटील यांनी हा हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही असा इशारा दिला आहे.
म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
2019 ला विश्वासघात करुन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलेल्याला येत्या २६ फेब्रुवारीला २७ महिने पूर्ण होतील. या काळात अनेकांचे भ्रष्टाचाराचे विषय समोर आले. दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत कधीच घडलेली नव्हती अशी मोठी उलथापालथ सुरु आहे.
एकनाथ शिंदेचा वाढदिनीच भाजपला जोरदार धक्का; भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
त्यामध्ये परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला, अनिल देशमुख यांनी केलेली आरोपांवर काही कारवाई नाही झाली, म्हणून मग जयश्री पाटील नावाच्या वकिल आणि सामाजिक कार्यकर्त्या कोर्टात गेल्या आणि कोर्टाने सीबीआय सांगितली. सीबीआय चौकशी लागल्यानंतरही अनेक दिवस, अनिल देशमुख चकवा देत राहिले. पण त्यांना अटक झाली, संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.
मुंबईत शिवसेनाच दादा आहे, टीका करायचं काही कारण नाही; संजय राऊतांनी पुन्हा ठणकावलं
स्वत: ठाकरु कुटुंबियांमध्येही अनेक आरोप झाले. पण या सर्वात कधीही अशी परिस्थिती आली नव्हती की किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करा. सोमय्या यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणं, घोषणा देणं, पण केंद्राची झेड सुरक्षा असतानाही त्यांना धक्का मारुन किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणं हे गेल्या २७ महिन्यात पहिल्यांदा झाला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
अशा एका माणसावर आरोप झालेत की त्याला ते सहन झाले नाहीत, त्याला ते पेलत नाहीएत, आणि त्या सहन न होण्यातून हल्ला झाला आहे. आणि रोज उठून प्रेससमोर धमक्या दिल्या जात आहेत, आम्ही वाघ आहोत, मुंबई आमची आहे, असं सर्व सुरु झालं आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला आहे.
Read also:
- अटक करुन जेलमध्ये टाका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप
- महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये ‘त्रिसूत्री’
- मजबूत भाजपसाठी जोशुआंना पाठबळ द्या; अभिनेता किशन कुमार यांचे आवाहन
- अमरावतीत आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी; आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल
- पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी