अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी आता आमदार रवी राणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेचा वाढदिनीच भाजपला जोरदार धक्का; भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
रवी राणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रवी राणा यांनी स्पष्टीकरण दिलं असून यामध्ये आपला कोणताही हात नसल्याचा दावा केला आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माझ्यावर गुन्हे दाखल करुन रवी राणाला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील पोलीस आयुक्तांना दिला आहे, असा दावा रणी राणा यांनी केली आहे.
मुंबईत शिवसेनाच दादा आहे, टीका करायचं काही कारण नाही; संजय राऊतांनी पुन्हा ठणकावलं
रवी राणा पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे डीजीदेखील यात सहभागी आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या विषयावर कोणी काही बोललं तर त्याला अडकवायचं, फसवायचं, अटक करायची असा प्रकार सुरु आहे. महाराष्ट्रात गेलो तर अटक करुन जेलमध्ये टाकतील, असे मला पोलिसांचे फोन येत आहेत, असा दावा रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मी कुठे फरार नसून अमरावतीत जाणार आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असतील तर मी सामोरं जाणार, असंही रणी राणा यांनी म्हटलं आहे.
Read also:
- महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये ‘त्रिसूत्री’
- मजबूत भाजपसाठी जोशुआंना पाठबळ द्या; अभिनेता किशन कुमार यांचे आवाहन
- अमरावतीत आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी; आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल
- पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी
- नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा