मुंबई : आगामी काळातील मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढचा गियर टाकला आहे. दिग्ग्ज आणि वजनदार मंत्र्यांचे मुंबई, पुण्यात दौरे वाढले आहेत.
महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये ‘त्रिसूत्री’
आज सकाळी मुंबईमधील वरळी विधानसभा मतदारसंघात म्हणजेच आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विविध विकासकामांची पाहणी केली आहे. वरळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सध्या विकासकामे सुरु आहेत आणि आज दोन मंत्र्यांनी इथं उपस्थिती दर्शविल्याने सगळीकडे या दौऱ्याची चर्चा रंगली आहे.
अटक करुन जेलमध्ये टाका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आता कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. मतदारसंघातील रस्ते मोठ-मोठे करण्यात येत आहेत. आपल्या मतदारसंघाचा आणखी विकास करण्यात यावा, तसेच आपल्या मतदारसंघाचा अर्थमंत्र्यांनी करावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासोबत हा दौरा केला असल्याचं बोललं जात आहे.
किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवारांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी अजित पवारांचे स्वारथ्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे सकाळी ६ किंवा ७ वाजता आपला दौरा सुरु करत असताता. आज आदित्य ठाकरेंनी देखील सकाळी लवकर पाहणी दौरा केल्याने आता आदित्य ठाकरेंनी अजित पवारांचा काम करण्याचा वसा घेतला आहे की काय ? असं देखील बोललं जातं आहे.
Read also:
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा
- मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?