मुंबई : आगामी काळातील मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढचा गियर टाकला आहे. दिग्ग्ज आणि वजनदार मंत्र्यांचे मुंबई, पुण्यात दौरे वाढले आहेत. याच दरम्यान आता युवासेनाप्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची टॅग लाईन ठरवली आहे.
किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
मागील सहा महिन्यांपासून मुंबईत अनेक विकास कामांना जोर आल्याचे दिसत आहेत. त्यातच विविध मुंबईतील विकास काम घेऊन ‘पुढे चला मुंबई’ असा शिवसेनेचा नवा नारा असणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक प्रचार आता ऑफलाईन मोड प्रमाणे ओनलाईन मोडवर देखील तितक्याच आक्रमकतेने सुरु होणार आहे. मागील निवडणुकांपासून डिजिटल प्रचारातही चांगलीच वाढ झालेली आहे आणि त्याचा फायदा देखील होताना दिसलेला आहे.
मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?
मुंबई महानगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीत शिवसेनेची टॅगलाईन चांगलीच लोकप्रिय झाली होती. यासोबतच भाजपनेही टॅगलाईनचा वापर चांगल्या प्रकारे केल्याने भाजपला देखील तितकाच फायदा झाला होता. शिवसेनेनं मागच्यावेळी ‘करून दाखवलं’ अशी टॅगलाईन चालवली होती. आजकाल टॅगलाइन’च्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यातच आता आगामी निवडणूकांसाठी सगळेच पक्ष अशा टॅगलाईन बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यातच शिवसेनेची प्रचार लाईन ठरली असल्याची माहिती मिळत आहे. आता भाजप या टॅगलाईन कसा उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा