पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात कमालीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपचा गेल्या ५ वर्षांमधील भ्रष्टाचार बाहेर काढू असं म्हटलं होतं.
सगळ्यांना माहित आहे की पाठीत खंजीर कोणी खुपसला; देवेंद्र फडणवीसांच आदित्य ठाकरेंना प्रत्यूत्तर
यावर आता भाजपकडून आमदार चंद्रकांत दादा यांनी पलटवार केला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे मेट्रो, चांदणी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार असे अनेक विकासाचे प्रकल्प उभारले जात आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये ५० वर्ष विरुद्ध ५ वर्ष आम्ही केलेल्या कामाचा हिशोब सांगणार आहोत असं प्रतिपादन चंद्रकांत पाटील कोथरूड मधील आशिष गार्डन-सागर कॉलनी-शांतीबन चौक डीपी रोडच्या उद्घाटनप्रसंगी केले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण हलवून देणारी पत्रकार परिषद उद्या होणार; संजय राऊतांचा भाजपा विरुद्ध एल्गार
यावेळी चंद्रकांत पाटील पाटील म्हणाले, १९८२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना, अनेकदा पुण्यात येण्याचा योग आला. तेव्हापासून पुणे शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे आशियातील सर्वात जलदगतीने वाढणारे शहर म्हणून पुण्याची ख्याती झाली. २० वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेचे बजेट १३०० कोटींचे होते. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने मेट्रोच्या माध्यमातून ११ हजार कोटींचा प्रकल्प पुणेकरांसाठी आणला. मात्र काही विरोधी नेते याचे सध्या उदघाटन करत आहेत. पुण्यातील जनतेला हे प्रकल्प कोणी आणले हे माहित आहे असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मारला आहे.
कोकणात जोरदार राडा; भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
या वेळी आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक किरण दगडे-पाटील, दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, अल्पना वर्पे, अॅड. वासंती जाधव, पुणे शहर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, गणेश वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.
Read also:
- शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी; काय आहेत नियम… वाचा सविस्तर…
- चर्चा तर होणारच.! राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदुह्रदयसम्राच, घाटकोपरमध्ये भलमोठं बॅनर
- संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण
तोंड दाबलेलं, हात पकडलेले; अशा अवस्थेत अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात - नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी – देवेंद्र फडणवीस