मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत, अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. यातच आता, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने अजित पवारांच्या एका निकटवर्तीयावर मोठी कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे.
वर्षावरच्या ‘त्या’ बैठकीत काय झाले? स्वतः शरद पवारांनी केला मोठा खुलासा
सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी, चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आणखी ७० जणांवर कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५ आणि कलम ४६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ED has attached assets of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana (purchase price of Rs. 65,75,00,000/- in the year 2010) situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra under PMLA in a case related to Maharashtra State Co-operative Bank.
— ED (@dir_ed) July 1, 2021
यांनतर यावर चौकशी समिती नेमण्यात आली. या निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांच्या चौकशी समितीने, फेब्रु.२०२० मध्ये हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला. यांनतर, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने, सहकारी बँकेतील घोटाळ्याबाबत अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासोबत ६५ जणांना, फेब्रु. २०२१ मध्ये दिलासा देऊन, क्लीन चिट दिली होती. तसेच, मुंबईच्या सेशन्स कोर्टात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस स्वबळावर लढणार; भाजप कोंडी करणार?
मात्र, या निकालाला माजी मंत्र्यांसह आणखी ५ जणांनी आव्हान दिलं होतं. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिकराव जाधव यांच्यासोबत आणखी दोघांनी या प्रकरणी प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता ईडीने ही कारवाई केली असून, अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला असून, त्यानुसार आता पुढील कारवाई करण्यात येईल.
Read Also :
- “कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार, मात्र…” पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले
- कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होईन; महादेव जाणकरांची गर्जना
- “शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही” – शरद पवार
- केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही