पुणे: पिंपरी महापालिकेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसकडून स्वबळाच्या गोष्टी केल्या जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील जागावाटपाबाबत सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या . महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल, असे विधान राऊत यांनी केले आहे .
हे पण वाचा: ‘’जो वेळ मिळाला आहे तो वेळ ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त करावा’’ – पंकजा मुंडे
हे पण वाचा: ‘’जो वेळ मिळाला आहे तो वेळ ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त करावा’’ – पंकजा मुंडे
शिवसेनेच्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱयांच्या बैठका शुक्रवारी आकुर्डी येथे पार पडल्या.यावेळी ते बोलत होते.
हे पण वाचा: केंद्रासह भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ट्वीटरवर कारवाई; नवाब मलिक यांची टीका
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही, हे योग्य वेळी ठरविले जाईल. सन्मानाने जागा वाटप झाले तर आम्ही विचार करू, आघाडी होणार नाही असे आम्ही म्हणत नाही. सन्मानाने जागा वाटपाबाबत नक्कीच चर्चा केली जाईल, असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा: देशात समान नागरी कायद्याची गरज न्यायालयाने केली मागणी, केंद्राने पावले उचलावीत
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना तयारी करत आहे. शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचे मुद्दे हाती घेऊन निवडणूक लढणार आहे, तसेच भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची घोषणा करून महापालिकेची सत्ता हस्तगत करणाऱया भाजपने गेल्या चार-साडेचार वर्षांत शत-प्रतिशत भ्रष्टाचार केला. ठेके वाटून घेणाऱया दोन आमदारांनी महापालिका लुटून खाल्ली. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचारी महापालिका अशी पिंपरी-चिंचवड महापालिकेची ओळख झाली. जनतेच्या पैशांची लूट होत असून, ही लूट शिवसेना सहन करणार नाही, असेही राऊत म्हणाले.