पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. सध्या आढळराव पाटील मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेतांना दिसत आहेत. महायुतीचे सर्वच नेते आढळरावांच्या प्रचारासाठी झपाटून कामाला लागले आहेत. अशातच आता भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी सक्रीय झाले आहेत.
हेही वाचा…बीड लोकसभेतून ज्योती मेटे यांची माघार, पत्रकार परिषदेतून केली घोषणा
आमदार महेश लांडगे यांनी आता प्रत्यक्ष मैदानात उतरून शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रचार सुरू केला आहे. अलिकडेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक. ५, ६, ७, ८, ९, ११ आणि १३ मधील भाजपचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. यावेळी शिरूर लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभेतून १ लाखांचे मताधिक्य देण्याचा निर्धार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलतांना महेश लांडगे म्हणाले की, राष्ट्र प्रथम ही भावना भाजपचा आत्मा आहे. त्यामुळे बलशाही भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचा निकराने प्रचार करेल, असा विश्वास देखील महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज भोसरी विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांनी जेसीबीच्या सहाय्याने फुलं उधळत आढळरावाचं जंगी स्वागत केलं. तर आज आढळरावांनी मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात लोकांशी संवाद साधला. यावेळी आढळरावांनी मागील १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला. तसेच जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे’’ असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
READ ALSO :
“कोकणाचे नंदनवन केल्याशिवाय गप्प बसणार नाही”, तटकरेंनी नागरिकांना दिलं आश्वासन
हेही वाचा…अखेर ठरलं ! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात ‘या’ दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा