नाशिक: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे पार पडले. त्यानंतर आज नाशिकमध्येही मूक आंदोलन होत आहे. खासदार संभाजीराजे नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या मूक आंदोलनाला जिल्ह्यातील १५ आमदारांचा पाठिंबा आहे.
हे पण वाचा: मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका; ५४ मुद्द्यांचा आधार घेत पाटील पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात
‘समाज बोलला,आम्ही बोललो,आता तुम्ही बोला’ असं म्हणत मराठा समाजाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे. या मूक आंदोलनात, सर्वपक्षीय नेते भूमिका मांडणार आहे. या आंदोलनात विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ,मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यासह खासदार डॉ भारती पवार,हेमंत गोडसे भूमिका मांडणार आहे.
हे पण वाचा: मराठा आरक्षण : प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश; समन्वयासाठी समितीही नेमा – उद्धव ठाकरे
आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर नंतर नाशिकमध्ये आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक सहभागी होणार आहे.
हे पण वाचा: मराठा आरक्षण मूक आंदोलन : “सर्वांचा पाठिंबा आणि कुणाचाही विरोध नाही, तर हा पेच सुटत का नाही?”
जिल्ह्यातील सर्व १५ आमदारांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आमदारही आपली भूमिका मांडणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मूक आंदोलन होईल, त्यानंतर संभाजीराजे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कोरोनाचे नियम पाळून या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.
सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही?
सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांच्या पर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. तसेच आरक्षणाच्या निकालामुळे विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठा समाजातील तरुणांना नियुक्ती देताना आर्थिक भार सोसण्यास शासन तयार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.