मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणात येत असतानाही काही ठिकाणी मात्र नागरिकांचा बेजबाबदरापणा आताही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या यंत्रणेच्या कामात हाच बेजबाबदारपणा अडथळे आणत आहे. हेच चित्र पाहून मुंबईवरील संकट आणखी वाढून न देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना दोन मास्क वापरण्याची कळकळीची विनंती केली.
‘मी हात जोडून विनंती करते, सर्वांनी एका वेळी दोन मास्कचा वापर करा. यासोबतच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका’, अशा शब्दांत महापौरांनी सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. सोबतच नागरिकांकडून त्यांनी सहकार्याची अपेक्षाही केली. सध्याच्या घडीला कोरोना काळात एकाच मास्कचा वापर न करता एका वेळी दोन मास्कचा वापर करत नाक आणि तोंड झाकण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महापौरांनीही याचाच पुनरुच्चार केला.
I request everyone with folded hands to wear a mask, that too double masks. People are requested to not step out of their houses unnecessarily: Mumbai Mayor Kishori Pednekar#COVID19 pic.twitter.com/zyjTAPew6x
— ANI (@ANI) May 1, 2021