राज्यातील महाविकासआघाडी मधील कुरुबुरी काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता त्यामुळे काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहेत.
आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे.