मुंबई : विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. प्राजक्त तनपुरे यांची काम कोरोना चाचणी करण्यात आली होती.
‘सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होणार’, असं ट्वीट मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं
सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या.
कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार✊— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) September 7, 2020
राज्यात विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवनेशन आज आणि उद्या (8 सप्टेंबर) घेण्यात येत आहे. मात्र, यादरम्यान राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.