राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार असून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन प्रमाणित नसलेल्या दुधात निळ टाकण्याचे निर्देश पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.

सुनील केदार म्हणाले, दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरिता दुधाचे नमुने तपासण्याकरिता मी स्वत: मराठवाडा विभागात जाणार असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे नमुने तपासण्याकरिता जाणार आहे. तसेच मुंबईसह ठाणे या भागात दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हे दुधाचे नमुने तपासून दोंषीवर कारवाई करणार आहे, असे केदार यांनी सांगितले.
राज्यात भेसळयुक्त दुध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांच्या दूध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी दूध भेसळ हा विषय गांभिऱ्याने हाताळावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.