पुणे : पुण्यामध्ये शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्पेक्स, बालेवाडी येथे अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा होत असतात. तसेच अनेक खेळाडू येथे स्पर्धेची तयारी करत असतात. मात्र, याच कॉम्पेक्समध्ये राष्ट्रवादी क्राँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे काही वरिष्ठ मंत्र्यांनी रेसट्रॅकवर कार पार्क केल्याबद्दल वाद निर्माण झाला आहे. याबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवारांच्या पायाला दुखापत; गाड्या घातल्या थेट ‘रेस ट्रॅक’वर
त्याचबरोबर राज्याचे क्रीडामंत्री सुनिल केदार यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. पवार साहेबांच्या गाड्या आत घातल्याने जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय होता. चुकीचा होता असे म्हणत क्रिडा मंत्री सुनिल केदार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या नंतर अश्या कुठल्याही प्रकारची घटना घडणार नाही. याची चोख काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. अशी अवहेलना, क्रीडा खात्याकडून होणार नाही, याची आम्ही दक्षता घेवू, असेही त्यांनी सांगितले.
#VIP Culture & Arrogance of the #MVA…
Athletic track at Shivchhatrapati Sports Complex (#PUNE ) being used as a parking lot for Cars belonging Ex. IOA President @PawarSpeaks ji, Sports Cabinet Minister @SunilKedar1111 ji and MoS Sports @iAditiTatkare jiCourtesy : @mataonline pic.twitter.com/T2P5X9oPeO
— Siddharth Shirole (@SidShirole) June 27, 2021
शनिवारी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासह पुण्यातील शिव छत्रपती स्पोप्ट्स कॉम्पेक्समध्ये एका प्रोजेक्टची पाहाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी रेसट्रॅकवर कार पार्क केल्या असल्याचे फोटो भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ट्विटरवर शेअर केले होते.
Vehicles were allowed to be parked on cemented tracks as Pawar Sahab had an issue with his leg. It was allowed so that he doesn't face problem in walking: Maharashtra Sports Commissioner to ANI on VVIPs' cars parked on athletes' race track in Pune's Shivchhatrapati Sports Complex pic.twitter.com/P4Zm9KtQQs
— ANI (@ANI) June 27, 2021
त्यानंतर किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की ‘खेळांबद्दल आणि आपल्या देशातील क्रीडा नैतिकतेबद्दलचा अनादर पाहून मला वैयक्तिकरित्या फार वाईट वाटले. आपल्याकडे आधीच क्रीडा सुविधांची कमी आहे. प्रत्येक स्पोर्ट्स सेंटरकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे. याबद्दल माफी मागताना पुणे प्रशासनाने म्हटले आहे की ‘या घटनेची नोंद केंद्रिय क्रीडामंत्र्यांनी घेतली असून अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढे ऍथलेटिक ट्रॅकवर कोणत्याही गाड्या पार्क करण्यात येणार नाहीत.’
I'm personally very sad to see such disrespect for sports and sporting ethics in our country. https://t.co/XV47LRckmJ
— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 27, 2021
त्याचबरोबर महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले की, शरद पवार यांना पायाच्या दुखापतीची समस्या होती. त्यामुळे त्यांना ट्रॅकच्या जवळ सिमेंट कॉन्क्रीट रोडवर कार पार्क करण्याची परवानगी देण्यात आली होती.
Read Also :
- ‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
- मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
- ‘सर्वकाही मनाप्रमाणे होईल, पण संन्यास घेऊ नका’, फडणवीसांवर सामनातुन खोचक टीका
- टीकेचं विष प्राशन करुन ओबीसींना आरक्षण मिळत असेल, तर आमची तयारी आहे; पंकजा मुंडे म्हणतात…
- ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप