पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे म्हणजेच भाजपचे तडफदार नेते. त्यांच्या या तडफदार वृत्तीमुळे ते नेहमीच धडाकेबाज काम करत असतात. आणि जनतेची सेवा हाच त्यांचा उद्देश असतो. आज २७ नोव्हेंबर म्हणजेच दादांचा वाढदिवस.. विशेष म्हणजे महेशदादा त्यांच्या वाढदिवस नेहमीच समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करतात. याही वर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसानिम्मित अनेक उपक्रम राबवले आहेत.
गतवर्षी त्यांनी आपला वाढदिवस हा कोरोना योद्धांना समर्पित केला होता. आणि आता यावर्षी या कोरोनाचा महामारीतून बाहेर पडत आहेत या लोंकाना आनंदी ठेवायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी अनेक कायर्क्रम राबवले आहे. जे समाजपयोगी आणि आनंद देणारे आहेत. आज २७ नोव्हेंबर राष्ट्रीय अवयव दान दिनानिमित्त दादांनी संकल्प केला आहे की, १ लाखापेक्षा अधिक अवयव दान करून अनेक अवयव प्रत्यारोपण पासून वंचित असलेल्या लोकांना पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न दादा करत आहेत. “चला अवयवदान करुया मानवता धर्माचे पालन करुया!” असा सामाजिक संदेश त्यांनी जनतेला सांगितलं आहे.
यावर्षी महेश दादांच्या वाढदिवसानिम्मित पिंपरी चिंचवड अनेक उपक्रम राबवण्यात आले. ह.भ.प.शिवलिलाताई पाटील आणि चैतन्य महाराज वाडेकर यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच पिंपरी चिंचवडमधली काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगवला होता. तसेच रक्तदान शिबीर देखील भरवण्यात आले. दरम्यान, महेशदादा लांडगे यांचा इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान उपक्रमा अंतर्गत २८ नोव्हेंबर रोजी भारतातील सर्वात मोठी रिव्हर सायक्लोथॉन मोहिम राबवण्यात येणार आहे. सकाळी 6 वाजता भोसरीतील गावजत्रा मैदान येथून या रिव्हर सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रची प्रेरणा असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा १४० फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे, पिंपरी चिंचवडमधील बोऱ्हाडेवाडी–मोशी येथी ३ एकर जमिनीवर हा पुतळा उभारण्यात येणार आहे. लवकरच याचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. ‘छत्रपती संभाजीराजे यांच्या आशिर्वादामुळेच रोजच्या जीवनात धर्माचे पालन करुन गरजूंची सेवा करण्याची संधी मिळते. ‘ असे विचार असणारे महेशदादा कधीच गरजूंची सेवा करण्यात हात आखडता घेत नाही.
महेश दादांची राजकीय कारकीर्द-
महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड मधील भोसरी मतदार संघाचे आमदार. आमदारकीची ही त्यांची दुसरी टर्म आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. आणि नंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले.त्यांनतर गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत ते भाजपकडून भोसरी मतदारसंघातून ७७ हजार मतांनी निवडून आले. आणि त्यांनी पिंपरी चिंचवड मधील भोसरी मध्ये आपला राजकीय दरारा कायम ठेवला. तसेच मोठा योगायोग म्हणजे गेल्यावर्षी २७ नोव्हेंबर रोजी म्हणजेच त्यांच्या वाढदिवशी त्यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली. त्याला आता २ वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
महेशदादा लांडगे यांची राजकीय कारकीर्द एनएसयुआयचे शहराध्यक्ष पदापासून सुरु झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी पहिले पाऊल ठेवले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनतर २००४ ला ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक झाले. नंतर त्यांनी या पदाची हॅट्रिक केली. राष्ट्रवादीत बरीच वर्ष चपळ आणि वादग्रस्त राजकीय कारकिर्दीनंतर राष्ट्रवादी पक्षाला राजीनामा देऊन त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २५ ऑक्टोबर २०१६ रोजी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार महेशदादा लांडगे यांनी या एका वर्षाच्या कालावधीत पिंपरी चिंचवड भाजपतर्फे अनेक उपक्रम राबवले. तसेच आपल्या भोसरी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी भोसरी व्हिजन २०२० हा उपक्रम देखील राबवला होता.
महेशदादांचे सामाजिक कार्य
महेश लांडगे यांचा सामाजिक कार्यात मोठा वारसा आहे. या सामाजिक कार्यासाठी महेशदादांनी काही टीम तयार केल्या आहेत. ज्याद्वारे ते गरजू लोकांना त्यांच्या प्रमुख उपक्रमांद्वारे मदत करत आहेत
- महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन
- महेशदादा व्हिजन अकॅडमी
- हौसिंग सोसायटी फेडरेशन
- शिवांजली सखी मंच
- परिवर्तन हेल्पलाईन
- वायसीएम हेल्प डेस्क
- वर्कर वेलफेअर असोसिएशन
या काही सामाजिक उपक्रमांद्वारे ते तरुण वर्गाला प्रोत्साहित करतात तर गरीब गरजूना मदत करत असतात.
पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पक्षाची नवी उमेद म्हणजे महेशदादा लांडगे. आपल्या मतदारसंघात त्यांनी एवढं आपलं राजकीय स्थान एवढं भक्कम करून ठेवलं आहे, की त्यांना हरवणं आता कोणालाही शक्य नाही. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे ‘हरणं मला माहीत नाही’, हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी ठासून भरलेला आहे. आगामी राजकीय जीवनात कितीही कठोर अडथळे आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची त्यांची भूमिका इतरांना आदर्श घालून देणारी ठरेल. असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. अशा या दानशूर आणि रोखठोक नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!