पिंपरी : नुकतीच महाराष्ट्र प्रेस क्लबची पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये अनेक तरुण पत्रकारांना साधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये स्थानिक पत्रकारांसह अनेक अनुभवी व्यक्तींचा देखील समावेश आहे. पिंपरी चिंचवडच्या महाराष्ट्र प्रेस क्लबमध्ये निवड झालेल्या सर्व पत्रकारांचे आमदार महेश लांडगे यांनी देखील अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र प्रेस क्लब अध्यक्ष पदी अमोल शित्रे यांची वर्णी लागली असून उपाध्यक्ष पदी मनीषा थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यध्यक्ष पदी गणेश हुंबे तर सरचिणीस पद अमोल काकडे यांच्याकडे देण्यात आले आहे. विकास शिंदे यांच्याकडे कोषाध्यक्ष पद तर अमृता ओंबाळे आणि प्रदीप लोखंडे यांचा क्लब कार्यकारणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
भोसरीचे आमदार आणि पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट टाकत सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले आहे. महेश लांडगे हे आपल्या सोशल मीडियाच्या मध्यमातून अनेक गोष्टींवर नेहमीच भाष्य करत असतात.म्हणूनच या पत्रकारांचे आमदार लांडगे यांनी अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Read Also
कोरोनाची लागण झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार रुग्णालयात दाखल…https://t.co/KX9pn46uN3#AjitPawar #Corona
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020