कोरोनाच्या काळात अनेक लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांना मदत म्हणून जनसंपर्क ठेवला यामुळे अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील मुंबईला प्रवास केला होता. त्यांना या दरम्यान कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज आहे. कोरोनाची लागण झालेले कोकाटे हे नाशिकचे चौथे आमदार आहेत. त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे.
यापूर्वी आणदार सरोज अहिरे (देवळाली), आमदार नरेंद्र दराडे (येवला), आमदार डॉ. राहूल आहेर (देवळा) यांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांसह विविध राजकीय नेते, नगरसेवकांना कोरोनाची लागण झालेली आहे.
आमदार कोकाटे यांनी काल रात्री याबाबत माहिती दिली. त्यांनी मतदारसंघातील नागरिकांना सोशल मिडीयाद्वारे संदेश देखील पाठवला आहे. आमदार कोकाटे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व निकटवर्तीयांना त्याची लागण झाली किंवा कसे याची माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नागरिकांशी संपर्क, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि कार्यक्रमांना उपस्थित राहतांना अनेक नेते विशेष दक्षता घेत असतात. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वावरणारे अलर्ट झाले आहेत.कोरोनाचा प्रसार जरी कमी झालेला असेल तरी त्याची व्याप्ती अद्याप कमी झालेली नाही.
Read This Also
कपिल सिब्बल त्यांच्या नव्या ट्विटमुळे काँग्रेसमध्ये पुन्हा चर्चांना उधाणhttps://t.co/1gGs3zuSse
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020