नवी मुंबई : मागील काही दिवसात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सरकार पाडण्यासाठी ईडी सारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी आज पहाटे 4 वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी बोलताना ईडी चौकशीबाबत ते म्हणाले की, उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे.
कृषी कायद्यावरून देखील रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले.
Read Also :
- ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सेनेचे गुजराती कार्ड
- महाराष्ट्रात आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी
- शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक
- आदर्श गाव ‘हिवरे बाजारात’ तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक
- सरपंचपदाच्या लिलावाच्या घटनेची गंभीर दखल, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश
- ‘आमच्यामुळेच मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा, सेनेचा काँग्रेसला इशारा
- ‘सत्तेची भूक भागवण्यासाठी भाजपकडून राज्यपाल कार्यालयाचा वापर’