अहमदनगर : कर्जत तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ४० बेडचे ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असलेले कोविड सेंटर सुरू केले आहे.रोहित पवार यांच्या सृजन संस्थेच्यामार्फत हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.
या कोविड सेंटरचे उद्घाटन विद्या काकडे व डॉ.रोहित काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.सुरुवातीला नगर शहर तसेच परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. परंतु आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नवीन कोविड सेंटर सुरू केले आहे. कोरोनाचा उपचार तालुक्याच्या ठिकाणीच मिळणार असल्याने तालुक्यातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Read Also
पुणे कोरोनमुक्त करण्यासाठी आता स्वतः शरद पवार मैदानातhttps://t.co/xyXcnssemU@PawarSpeaks @NCPspeaks @NCPPuneCity
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 5, 2020