पुण्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीद्वारे करा तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीने रुग्णालयांची उभारणी करण्याची निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,” पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहेत कोणत्याही परिस्थिती हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात असे अजित पवार यांनी सांगितले