पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून सांगितली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
ठाकरे सरकारकडून आता विद्यापीठांनाही राजकारणाचा अड्डा बनवाण्याचा घाट घातला जातोय; फडणवीस आक्रमक
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन करताना म्हटलं की, काळजी घेण्याचं कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती, तसंच काळजी घ्या असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, काल राज्यात तब्बल २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत मंगळवारी १ हजार ३७७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहर उपनगरात ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत. सोमवारी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ९६७ दिवसांवर होता. मंगळवारी हे प्रमाण ८४१ दिवसांवर आले आहे, तर २१ ते २७ डिसेंबरपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.९ टक्के झाला आहे. सोमवारी हा दर ०.७ टक्के इतका होता.
Read also:
- विद्यापीठ कायद्याबद्दल विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंताचे प्रत्यूत्तर
- नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला; विद्यापीठ विधेयकावरून सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
- राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत; दोन दिवसांत होणार निर्णय
- मुख्यमंत्र्यांच्या खरमरीत पत्रावर राज्यपाल कोश्यारींची तीव्र शब्दात नाराजी; उद्धव ठाकरे म्हणतात…
- अर्धा गुंठा, एक गुंठा जागेवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा – आमदार महेश लांडगे