मुंबई : लोकडाऊनमुळे अनेक छोट्यामोठ्या व्यवसायांना फटका बसत असताना जिम संघटनेनंतर आता मुंबईतील डबेवाल्यानी देखील कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि डबेवाल्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली. तसेच डबेवाल्यांच्या व्यथाही राज यांच्यासमोर मांडल्या.
मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचं निवेदन दिले आहे.
मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केलं. त्यामुळे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
Read Also
निलेश राणेंनी शुद्धीत बोलावे…https://t.co/7PF9m4dkBN#NileshRane #BJP #CMUddhavThackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020