मुंबई : मनसेच्या लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा दिला आहे. आमचे पोट लोकल सेवेवर अवलंबून असून, त्यामुळे तात्काळ रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.
“मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल” असा इशारा ठाकरे सरकारला मुंबईच्या डबेवाल्यांनी दिला आहे. आज डबेवाले राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली असून, मुंबईतील लोकल रेल्वे सुरू करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासाठी मनसे सविनय विनयभंग करण्याचा इशारा 17 सप्टेंबर रोजी दिला होता. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील बसमधील गर्दी दाखवित सांगितले होते की, ह्या गर्दीत कोरोना होत नाही आणि लोकलमध्ये कोरोना होतो का? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारवर उपस्थित केला होता. तसेच मुंबईची लोकल तात्काळ सुरू केली नाही तर आम्ही सविनय कायदेभंग करू असा इशारा सुद्धा मनसेच्या वतीने देण्यात आला होता.
Read Also :
योगी सरकारचा मोठा निर्णय ! बलात्कार आणि छेडछाड करणाऱ्यांना शहरातील चौकात …https://t.co/XlzwN0X626#YogiAdityanath #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020