मुंबई- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत, धमकी देणारा मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांच्या या टीकेला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशाराच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
‘उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील फडणवीसांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात ‘सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय?’ असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
Read Also –
‘मग सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात, ही धमकी नव्हती का?’; फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला ना राज्यपालांची उपस्थिती ना मुख्यमंत्र्यांची..!
“या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए”; फडणवीसांकडून ठाकरे सरकारची चिरफाड