देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत आहे. नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर चिखलीकर यांचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
नांदेड जिल्हा परिषद सदस्य असलेले प्रवीण पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा लागण झाली होती. यानंतर त्यानंतर त्यांचे वडील खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दोघांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत.
नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याआधी काँग्रेसच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.