अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला चार महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. उलट या प्रकरणी दररोज नवनवीन दावे पुढे येत आहेत. आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याची हत्या करण्यात आली. त्यावेळी सुशांतच्या घरी एक मंत्री देखील उपस्थित होता. असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. राणे म्हणाले,”सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याची हत्या करण्यात आली. त्यावेळी सुशांतच्या घरी एक मंत्री देखील उपस्थित होता. सुशांत प्रकरण जर उघड झाले तर महाराष्ट्र मंत्रिमंडळातील एक मंत्री तुरूंगात जाऊ शकतो”, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.”
राणे म्हणाले, ”घटनेच्या रात्री काही लोक सुशांतच्या घरी गेले होते, त्यांनी सुशांतला दिशा सालियानच्या खूनासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्या भांडणातच सुशांतला ठार केले गेले.” तसेच राणे म्हणाले की, त्यांच्याकडे या मंत्र्याविरोधात पुरावे असून ते सीबीआयकडे सोपवतील.