मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुंपल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील उडी घेतली आहे.
चंद्रकांत पाटलांनी 54 आमदारांच्या मुद्यांवरून अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर बोलताना अजितदादांनी जी गोष्ट झालेली आहे तिला चौदा महिने झाले आहे. मागची गोष्ट उकरून काढताय?, असा सवाल केला होता. यावर शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते?, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांनी दिले होते. त्यांच्या या टीकेला आता अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे.
नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की लोकं चंपा म्हणतात, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओकच्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणून करवीरकरांनी हाकललं, नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात, असा खोचक टोला त्यांनी चंद्रकांतदादांना लगावला.
Read Also :
- ‘अजितदादांनी शरद पवारांच्या ड्राव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरणे हे कोणत्या नैतिकतेत बसते?’
- ‘उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले’
- ‘खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर’
- जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’