IMPIMP
bjp bjp

बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी एनडीएमध्ये नेता निवडीसाठी बैठक

बिहार : बिहारमधील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर एनडीएमध्ये सत्तास्थापनेसाठी वेगवान राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. एनडीएच्या नेता निवडीसाठी रविवारी बैठक होत असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार यांचीच निवड केली जाण्याची शक्यता आहे, पण त्याबदल्यात जास्तीत जास्त मंत्रीपदे पदरात पाडून घेण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे.

एनडीएच्या नवनिर्वाचित आमदारांची रविवारी पाटणा येथे बैठक बोलावली आहे. यामध्ये आमदार आपल्या नेत्याची निवड करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते या बैठकीत पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असणार आहेतभाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहे, मात्र संख्याबळानुसार मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त जागा तसेच महत्त्वाची खाती भाजपला हवी आहेत. यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत खलबते सुरू आहेत