पिंपरी चिंचवड : आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. दोन्ही महानगरपालिकांचा गड राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली आहे तर आपली ताकद दाखवण्यासाठी काँग्रेस मैैदानात उतरली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे, कारण कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पिंपरी चिंचवड शहराकडे पक्षातील कचणाचंही लक्ष नाही, सगळे मोठे नेते पिंपरी चिंचवड कडे दुर्लक्ष करत आहेत, जर असंच घडत राहीलं तर पक्षासाठी एक सुद्धा कार्यकर्ता उरणार नाही, अशी टिका करत त्यांनी आपला राजीनामा वरिष्ठांना सोपवला आहे.
काँग्रेससाठी हा पिंपरी चिंचवडमधील मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण मागील काही काळापासून काँग्रेसने पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. पण आता जर नेते सोडून जात असतील तर काँग्रेसला ही निवडणूक कठीण जाईल हे मात्र नक्की आहे.
Read Also :
असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना, शायर मुनव्वर राणांची बोचरी टीका
मेधा कुलकर्णी भाजप सोडणार का? म्हणाल्या….
….तर राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, मंत्री वडेट्टीवारांचा दानवेंना टोला
नितीश कुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपद पण एनडीएच्या ‘या’ अटी आणि ही ‘नियम’ पाळावी लागणार