मुंबई : अमित शहा यांच्या झालेल्या जंगी सभेचा व्हिडीओ ट्विट करत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. ‘बंगाल मध्ये BJP ची सभा… एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंव्हा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संज्या हे बघून ठेव, विसरू नको. अति तिथे माती होणारच’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी व तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय वाद चांगलाच पेटलेला आहे. याच दरम्यान आता भाजपा नेता व मंत्र्यांचे दौरे देखील सुरू आहेत. दरम्यान,बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला.
केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. शाह यांच्या उपस्थितीत तृणमूलमधून बाहेर पडलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यासह ११ आमदार व एका माजी खासदाराने कमळ हाती घेतले. मिदनापूर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
बंगाल मध्ये BJP ची सभा… एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंव्हा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संज्या हे बघून ठेव, विसरू नको. अति तिथे माती होणारच. pic.twitter.com/9GoFA5O3Y5
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 20, 2020