संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ‘सामना’ वृत्तपत्रासाठी मुलाखत घेतली आहे. याचा फोटो राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता सर्वांनाच या मुलाखतीची उत्सुकता लागली आहे. तसेच संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे
“देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल.” असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल..@PawarSpeaks चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले. pic.twitter.com/pTdCKucP0n
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 6, 2020
यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे “खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे.” अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आई
निलेश राणे म्हणाले,” खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला. खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही.”
खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला. खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही. https://t.co/YKmjKj6nhb
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 7, 2020