सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून मुंबई आणि बिहार पोलीस आमनेसामने आले आहेत. तर या प्रकरणावरून राजकारणही चांगलेच रंगले आहे. दरम्यान, भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी देखील आता या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. याबाबत भाष्य करताना निलेश राणे यांनी थेट शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे.
काय म्हणालेत निलेश राणे नेमकं आपल्या ट्विटमध्ये
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस कमिश्नरांना भेटायला जातो त्या नंतर आज कमिश्नर प्रेस घेतात. काही तरी गडबड आहे हे न समजण्या इतकी लोकं मूर्ख नाही. जसे दिवस जातायत तसे T gang पुरावे नष्ट करत आहेत म्हणून रोज धडपड सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस कमिश्नरांना भेटायला जातो त्या नंतर आज कमिश्नर प्रेस घेतात. काही तरी गडबड आहे हे न समजण्या इतकी लोकं मूर्ख नाही. जसे दिवस जातायत तसे T gang पुरावे नष्ट करत आहेत म्हणून रोज धडपड सुरू आहे. https://t.co/MnV9JtKNgz
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 3, 2020
सुशांतच्या वडिलांनी आत्महत्या प्रकरणात पाटण्यात तक्रार नोंदवली होता. त्यात त्यांनी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आले आहेत. या प्रकरणात सध्या मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा संघर्ष होत असताना दिसत आहे.