उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे ट्विटरच्या माध्यमातून किंवा थेट पणे काही घडामोडींवर वक्तव्य करत आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्यांची चांगलीच चर्चा आहे.
पार्थ पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर आता भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील पार्थ लंबी रेस का घोडा हे अशा प्रकारचे एक ट्विट केले आहे.
हे ट्विट जरी थेटपने पार्थ यांना उद्देशून नसले तरी नितेश राणे यांनी चांगले टायमिंग साधत पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!
अशा प्रकारचे भाष्य आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
आज परत सांगतो..
पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!!
थांबू नकोस मित्रा !!
— nitesh rane (@NiteshNRane) August 12, 2020
तत्पूर्वी पार्थ पवार यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्यावर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले आहेत.