मुंबई: काल मुंबईमधील नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ या बंगल्याची अंतर्गत तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. नारायण राणे यांच्यासाठी ही कदाचित वाईट बातमी असली तरी सिंधुदुर्गातून राणेंसाठी एक आनंदाची बातमी समोर आली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांची जिल्हा बँकेच्या स्वीकृत तज्ञ संचालकपदी आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर दुसरे सदस्य म्हणून प्रकाश मोर्ये यांना संधी देण्यात आली आहे. काल ही प्रक्रिया पार पडली आहे.
हे पण वाचा, कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
मात्र आता नितेश राणेंच्या अडचणीत देखील वाढ होऊ शकते. कारण नितेश राणेंचं संचालकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री, शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्हा बँकेचा थकीत संचालक असू शकतो की नाही ही पूर्णतः कायदेशीर बाब आहे. हायकोर्टाने याआधी त्यांचं म्हणणं नाकारलं होतं. मात्र माझ्या अभ्यासानुसार याची नोंद घेतली जातील. शेवटी ते असं होईल की याच्यासाठीच केला होता का अट्टहास ?. एवढं त्यांनी सगळं केलं आहे, मागच्या दाराने मुलाला संचालकपदी बसविण्यात आले आहे. मात्र त्यांना कायदेशीर बाबींना तोंड द्यावे लागणार आहे.
हे पण वाचा, कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
आता सध्याला तरी मी त्यावर बोलू शकत नाही. शिवसेना काही त्यांच्या विरोधात भूमिका घेणार नाही मात्र जे त्यांच्या विरोधात लढले त्यांनी याबाबत नक्कीच भूमिका घ्यायला हवी असा सल्ला देखील दीपक केसरकर यांनी दिला आहे.
हे पण वाचा,
कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुण्याचा दौरा; मुरलीधर मोहोळांच्या ‘राजकीय’ वजनात होणार वाढ
शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा