मुंबई : अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला. आम्ही लोकशाही मार्गाने भाजपशी लढू. आम्हाला विश्वास आहे की, तेलंगणातील जनता राज्यात भाजपचा विस्तार रोखेल, असंही असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. 2016 मध्ये 4 जागा जिंकणार्या भाजपने यावेळी झालेल्या निवडणुकीत 48 जागांवर विजय मिळवला. त्याच वेळी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएम 44 जागा जिंकण्यात यशस्वी ठरला. हैदराबाद निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कामगिरीवर खूश असल्याचे सांगितले.
ग्रेटर हैदराबाद महापालिकेत आम्ही 44 जागा जिंकल्या. मी नव्याने निवडलेल्या सर्व नगरसेवकांशी बोललो आणि त्यांना शनिवारपासून काम सुरू करण्यास सांगितले. भाजपाचे एकदाच मिळालेलं यश आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत हे यश भाजपाला मिळणार नाही. या निवडणुकीत आम्ही कठोर परिश्रम केले आणि हैदराबादच्या लोकांनी दिलेला निर्णय आम्ही स्वीकारला आहे. महापालिका निवडणूक आहे, थोडं खाली-वर होणारच आहे. ओवेसी यांनी हैदराबादच्या जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगी आदित्यनाथ जिथे गेले तिथे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. सर्जिकल स्ट्राईकबद्दल ते बोलले होते आता भाजपावर लोकशाही स्टाइक झाला आहे. आकडेवारी सर्वांसमोर आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगी आदित्यनाथ जिथे गेले तिथे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. सर्जिकल स्ट्राईकबद्दल ते बोलले होते आता भाजपावर लोकशाही स्टाइक झाला आहे. आकडेवारी सर्वांसमोर आहे.