परळी : निवडणुकीत जरी हरले पण जनतेच्या नजरेतून पडले नाही. निवडणुकीत काही जण पराभूत होतात. तर राजकारण करायचं असेल तर कधी तरी पडावांचं लागतं. परंतु पंकजा मुंडेंची निष्ठा एवढी लेची-पेची नाही. असं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसऱ्याच्या मेळाव्याला केलं.
हेही वाचा…“शिंदे गटाचा पुढच्या वर्षी दसरा मेळावा होणार नाही, केंद्रात अन् राज्यात शिवसेना सत्तेत राहणार”
राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर पंकजा मुंडे आगामी निवडणुक कोणत्या मतदारसंघातून लढणार याचा मोठा प्रश्न पडला होता. कारण परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी झाले होते. ते आता महायुती सरकारसोबत असल्याने पंकजा मुंडे यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. यातच पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील भाषाणातून एक सुचक संकेत दिलं आहे.
हेही वाचा…“दसरा मेळाव्याला येत असताना पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात, एक ठार तर ३ जण गंभीर जखमी”
काहींना पद-प्रतिष्ठा मिळते. पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे. माझ्याकडे पद नसल्यामुळे तुमचं काम मला आता करता येत नाही. परंतु तरी परळी मतदारसंघात काम करीत आहेत. यातच शेगाव- पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्याकडे पाहून तुमचा मतदारसंघ हा माझाच मानते, तुमच्या मतदारसंघात देखील चांगलं काम केलं आहे. त्याकडे लक्ष आहे. असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आगामी विधानसभा निवडणुक शेगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून लढणार का ? याची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“खडसे आडनावामूळे पक्षातून डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..,” भाजपच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप
हेही वाचा…मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने..,”संघर्ष यात्रेतून रोहित पवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी, आझाद मैदानावर एकनाथ शिंदे काय बोलणार ?
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या हेलिकॉप्टरला बिघाड, नियोजित कार्यक्रम केला रद्द