पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. त्याआधी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात देखील तरूणांनी जोरदार आंदोलन करत गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा…ठाकरे की शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी होणार ? मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त, १२ हजार ४४९ पोलिस तैनात
पुण्याच्या टिळक स्मारक मध्ये शरद पवार युवा संघर्ष यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार निघाले असता पुण्यातील अलका टॉकीज येथे काही तरूणांनी शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यावेळी तरूणांकडे गो बॅक शरद पवार असे बॅनर देखील त्यांच्या हातात होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या तरूणांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा…राज्यात डग्जचा सुळसुळाट, पाहा कुठे आणि किती जप्त केला पोलिसांनी ड्रग्जचासाठा ?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून या तरूणांनी आंदोलन केला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचं अंतरसराठी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांच्या विरोधात आंदोलन केला जात असल्याचं समोर आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने..,”संघर्ष यात्रेतून रोहित पवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी, आझाद मैदानावर एकनाथ शिंदे काय बोलणार ?
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या हेलिकॉप्टरला बिघाड, नियोजित कार्यक्रम केला रद्द
हेही वाचा…“शिंदे गटाचा पुढच्या वर्षी दसरा मेळावा होणार नाही, केंद्रात अन् राज्यात शिवसेना सत्तेत राहणार”
हेही वाचा…“दसरा मेळाव्याला येत असताना पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात, एक ठार तर ३ जण गंभीर जखमी”