जळगाव : खडसे आडनाव असल्यामुळे माझी बदनामी केली जात आहे. तसेच लवकरच पक्षांतर्गत करणार असल्याचा आरोपही केला जात आहे. आम्ही परिवार म्हणून एक आहोत. परंतु आज त्यांनी पक्ष बदलला आहे. माझा पक्ष वेगळा आहे. कोणी कुठे काम केलं पाहिजे. माझ्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. एकनाथ खडसे यांचे विचार राष्ट्रवादीशी जुळत आहेत. माझे विचार भाजपशी जुळत आहेत. त्यामुळेच मी भाजपमध्ये आहे. गेली १० वर्ष मी रावेर मतदारसंघात कामे केली आहेत. तुम्ही फक्त खडसे या नावामुळे डालवण्याचा प्रयत्न करीत असतील तर ते चुकीचे आहे. असं भाजपच्या नेत्या खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“दसरा मेळाव्याला येत असताना पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात, एक ठार तर ३ जण गंभीर जखमी”
एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. परंतु त्यांची सून रक्षा खडसे खासदार म्हणून त्या भाजपमध्येच राहिल्या. यातच मागील काही दिवसापासून खडसे या नावामुळे मला पक्षातून डावलण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…ठाकरे की शिंदेंच्या मेळाव्याला गर्दी होणार ? मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त, १२ हजार ४४९ पोलिस तैनात
ज्या परिस्थिती २०१४ साली लोकसभेची निवडणुक लढली, ती सर्वांना माहिती आहे. परंतु खडसे साहेबांची सुन म्हणून ओळख ठेवली नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरून रक्षा खडसे या नावाची ओळख तयार केली आहे. परिवारातील एक माणुस पाठिशी उभा राहिला म्हणून त्या महिलेची ओळख आहे, असं समजत असाल तर ते चुकीचे आहे. परिवाराचा प्रत्येकाला पाठिंबा असतो. परंतु व्यक्तिगत महिलेचे देखील कर्तृत्व असतं. तीचं देखील काही मैदानावर काम असतं. हेच मी करण्याचा प्रयत्न केला आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…राज्यात डग्जचा सुळसुळाट, पाहा कुठे आणि किती जप्त केला पोलिसांनी ड्रग्जचासाठा ?
दरम्यान, काम करत असतांना काही चुका झाल्या असतील तर त्या मान्य करते, पंरतु यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला आहे. यातच पदाचा दुरूपयोग कुठेही केला नाही. मागच्या दहा वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त गावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु खडसे या नावामुळे मला बाजूला करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात करत असतील तर ते पुर्ण चुकीचं आहे.असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने..,”संघर्ष यात्रेतून रोहित पवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी, आझाद मैदानावर एकनाथ शिंदे काय बोलणार ?
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या हेलिकॉप्टरला बिघाड, नियोजित कार्यक्रम केला रद्द
हेही वाचा…“शिंदे गटाचा पुढच्या वर्षी दसरा मेळावा होणार नाही, केंद्रात अन् राज्यात शिवसेना सत्तेत राहणार”