राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुन्हा राजकारणात प्रवेश करण्याचंयाची शक्यता आहे. कारण पार्थ पवार हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून चाचपणीही सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासात वेग येण्यासाठी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी पार्थ दादा पवार यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.पार्थदादापवार यांनी काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची शनिवारी अचानक भेट घेऊन शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये पार्थ पवार यांनी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना 7 वा वेतन लागू करण्याबाबत चर्चा केली. त्याच बरोबर कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उभारलेल्या वॉर रूमलाही भेट दिली होती. त्यामुळे पार्थ दादा पवार हे पुन्हा सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र पार्थ दादा पवार यांच्या पुणेपदवीधरमतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.