मुंबई : शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदे गटावर धक्कादायक आरोप केले. त्यानंतर आता सेनेचेच आमदार तानाजी सावंत यांनी कैलास पाटील यांची फोलखोल केली आहे. कैलास पाटील यांना कोणत्याही व्यक्तींनी काहीही केलं नाही, तसेच अशा डबलडोलकी आमदारांपासून पक्षप्रमुखांनी सावध राहावं. असंही तानाजी सावंत यांनी केलं आहे.
शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात
विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर माझ्याच गाडीत कैलास पाटील सुरतकडे रवाना झाले. पुढे गुजरातच्या चेकपोस्टवर गेल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली. त्याठिकाणी ते मला बोलले की आपल्याला माघारी गेले पाहिजे. त्यानंतर त्यांना माझीच गाडी घेऊन मुंबईला जाण्यासं सांगितले. त्यानंतर तो माघारी आला.
शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री अन् केंद्रात 2 मंत्रीपद
त्यानंतर त्यांनी आज जे काही पत्रकार परिषदेमध्ये आमच्यावर आरोप केले आहेत. असं काहीही झालं नाही. त्यामुळे यांनी फक्त लोकांची त्याचबरोबर पक्षप्रमुखांची दिशाभूल केली आहे. त्यांनी पक्षप्रमुखांसह माझी देखील दिशाभुल केली आहे. तसेच गुवाहाटीला आलेला प्रत्येक आमदार हा स्वत: च्या इच्छेनुसार आला आहे. त्यांच्यावर कोणाताही दबाव नसल्याचं तानाजी सांवत यांनी सांगितलं आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या बंडांचा रविवारी शपथविधी होणार ?
दरम्यान, तसेच नितीन देशमुख यांनी केलेले सर्व आरोप शिंदे गटातील आमदारांनी फेटाळून लावले आहेत. नितीन देशमुख यांना स्वत: सेनेच्याच कार्यकर्त्यांनी नागपुरात सोडलं होतं. त्यामुळे त्यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. असं शिंदे गटातून सांगण्यात येत आहे.
Read also:
- “उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;