मुंबई : शिवसेनेची गळती थांबता थांबेना झाली आहे. एकनाश शिंदे गटाकडे आता शिवसेेनेचे तब्बल 42 आमदार सामील झाल्याची माहिती समोर येत असून शिवसेनेकडे फक्त 14 आमदार सोबत आहेत. अशातच आता राऊतांनी बंडखोर आमदारांनी 24 तासात महाराष्ट्रात आल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे. तसेच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचं वक्तव्य केलं आहे.
शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री अन् केंद्रात 2 मंत्रीपद
संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं संकेत दिल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीकडून सुचक वक्तव्य करण्यात आले. महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या बंडांचा रविवारी शपथविधी होणार ?
इडीच्या धाकाने भाजप महाविकास आघाडीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही. जर असं काही घडलं तर आम्ही विरोधी पक्षात बसण्यासाठी तयार आहोत. संजय राऊतांनी केलेले वक्तव्य हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. असं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
भाजपची अट, बंडखोर शिंदेगट भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन; प्रकाश आंबेडकरांचं ट्विट
दरम्यान, एकनाथ शिंदे गटात आता कृषी मंत्री दादा भुसे देखील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. तसेच शिवसेनेचा ठाण्या वाघ म्हणजे गुलाबराव पाटील देखील शिंदे गटात सामील झाले आहे. त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद घेऊन बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच येत्या २४ तासात परत आल्यावर महाविकास आघाडीतून बाहेर पडू असंही ते म्हणाले.
Read also:
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
- शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात