मुंबई : राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत युती नको सांगत बंडखोर एकनाथ शिंदे यांना आता भाजपने मोठी ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यात 8 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री पद आणि केंद्रात 2 केंद्रीय मंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील या सर्वात मोठा बंडांचा रविवारी शपथविधी पार पडणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
“उद्धव ठाकरेंबद्दल आदर वाढला, नाराज आमदारांना जोरदार चपराक”; इम्तियाज जलील
शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी आता 41 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे 4 खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. त्याच बरोबर काल खासदार भावना गवळी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती.
“शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका”, बंडखोर आमदारांना ठाकरेंनी ठणकावलं
महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आल्याने भाजपने देखील मोठ्या राजकीय हालचाली देखील वेगाने वाढविल्या आहेत. काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांच्याशी भेट घेतली होती. तर काल सागर बंगल्यावर देखील भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. यात काही अपक्ष आमदार देखील उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची गळती अजूनही सुरूच आहे. आज शिवसेनेचे चार आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामिल झाले असून ते आज गुवाहाटी येथे दाखल झालेत. त्यामुळे शिवसेनेकडे आता फक्त 56 आमदारांपैकी 14 आमदार सोबत असून शिंदे गटात 41 आमदार सोबत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळण्याची शक्यता आहे.
Read also:
- राज्यातील सर्वात मोठ्या बंडांचा रविवारी शपथविधी होणार ?
- भाजपची अट, बंडखोर शिंदेगट भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन; प्रकाश आंबेडकरांचं ट्विट
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे” आजच वर्षा बंगला सोडणार ; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
- एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवा; पवारांचा ठाकरेंना सल्ला, शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
- “सेनेच्या बंडखोर आमदारांना सोमय्यांकडे कपडे नेऊन देण्याची जबाबदारी”; राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं