पुणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या 36 आमदारांसोबत शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय भुकंप आला आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर लगेच एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन सुरत गाठलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार गुवाहाटीला हलवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला.
सेना अन् शिंदे गटात टोकाचा संघर्ष; एकनाथ शिंदेंनी विधिमंडळाचा मुख्यप्रतोद नेताच बदलला
एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. बंडखोरीनंतर महाविकास आघाडीतील सरकार अस्थिर झाल्याचं चित्र सध्या दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपच्या किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा नमस्कार ? म्हणाले.. “अशीच साथ राहु द्या”
आसामात लपलेल्या बंडखोरांना भाजपचे नेते कपडे नेऊन देताय असं ऐकलं. त्यात भाजपचे किरीट सोमय्या असेल तर आपण हसुया का? असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात जोरदार हालचाली सुरू असताना भाजपच्या एकाही नेत्यांनी सध्या कोणत्याही प्रकाराचं वक्तव्य केलं नाही. त्यामुळे भाजपने सध्या बघ्याची भूमिका घेतली आहे.
“ठाकरेंनी आता ‘मातोश्री 11’ नाव देऊन IPL ची तयारी करावी”; निलेश राणेंचा शाब्दिक टोला
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आमचे राजकीय किंवा वैचारिक मतभेद असू शकतात परंतु आज त्यांनी केलेल्या भाषणांमुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दलाचा आदर वाढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विनयशीलतेने शिवसेनेच्या पक्षातील सर्व नाराज आमदारांना जोरदार चपराक दिली आहे. असं ट्विट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
Read also:
- “उद्धव ठाकरेंबद्दल आदर वाढला, नाराज आमदारांना जोरदार चपराक”; इम्तियाज जलील
- “शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका”, बंडखोर आमदारांना ठाकरेंनी ठणकावलं
- “मी कसं काय बंड करेन, तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो”; एकनाथ शिंदें अन् मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद
- “शिवसेेनेचे सर्व आमदार शिंदेंसोबत फक्त पैशासाठी गेलेत”; इम्तियाज जलीलांचा नवा आरोप
- हिंदुत्वाच्या वनवासात ठाकरे अन् शिंदे राम लक्ष्मण जोडीसारखे, शिवसैनिकांनो रडायचे नाही