मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आता शिवसेनेकडून पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात सर्व आमदारांना आज 5 पर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्य प्रनोत सुनिल प्रभू यांनी आदेश दिले आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा पद्धतीचा देखील इशारा शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना दिला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आता नवा ट्विस्ट टाकला आहे.
शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य
बंडखोर आमदारांना आज सायंकाळ पर्यंत मुंबई दाखल होण्याचे आदेश सुनिल प्रभू यांनी आदेश काढले होते. मात्र त्यावर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेत शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत. असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थिततीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. २२ जून २०२२ रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००.००६ येथे सायंकाळी ०५.०० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे.
भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस. एम. एस. द्वारेही कळविली •आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही. सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असं त्या पत्रात म्हटलं आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
Read also:
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा नमस्कार ? म्हणाले.. “अशीच साथ राहु द्या”
- “ठाकरेंनी आता ‘मातोश्री 11’ नाव देऊन IPL ची तयारी करावी”; निलेश राणेंचा शाब्दिक टोला
- बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;
- उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिंदे गटात सामील; ४७ आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा
- जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप