मुंबई : एकनाथ शिंदे यांचं बंड काही थांबण्याचे नाव घेत नाही. कालपर्यंत शिवसेनेत असलेले जळगावचे आमदार आणि पाणी व पुरवठा मंत्री गुलाब राव पाटील देखील गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे आता सर्वच आमदार शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन
एकनाथ खडसे यांच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील यांची तोफ धडधडती राहिली आहे. काल झालेल्या शिवसेनेच्या वर्षा येथील बैठकीत १५ ते २० आमदार उपस्थित होते. त्यात गुलाबराव पाटील यांचा देखील समावेश होता. त्यामुळे ते शिवसेनेसोबतच असल्याचं बोललं जात होतं. मुंबईतील बैठकीनंतर काल ते जळगावाला रवाना झाले होते परंतु ते गुवाहाटीला गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर
गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना मोबाईलवरून जय महाराष्ट्र असा संदेश देखील पाठवलं असल्याचं समजतं आहे. त्यानंतर त्यांचा संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे ते देखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले की काय ? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे आता जवळपास शिवसेनेसह एकूण ४७ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलण्याचं टाळलं आहे. त्यावर त्यांना नो कमेंट्स असं सांगत प्रसार माध्यामांशी बोलण्याचं टाळलं आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त होण्याच्या मार्गावर असल्याचं सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सरकार कोसळणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also:
- जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
- शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य
- उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
- आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं