मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता संख्याबळांची तपासणी करण्याचे आदेेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना दिले आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल असं सुचक वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. त्याआधी मनसेने राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.
21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधान सभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल असा इशारा दिला. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून बरखास्तीचा प्रस्ताव राज्यपालांकडे देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती महाविकास आघाडी सरकारचं प्रस्ताव राज्यपाल स्विकारणार का ? याकडे लक्ष लागून राहिलं आहे तर महाराष्ट्र सरकार लवकरच कोसळणार असुन उद्धव ठाकरे हे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?
भाजपकडून जोरदार बैठका सुरू झाल्या असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील बैठका सत्र सुरू केलं आहे. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की पंतप्रधान देहुमध्ये आले आणि एकनाथांना घेऊन गेले, असा टोला छगन भुजबळांनी लगावला तर मनसे नेते गजानन काळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना पवार साहेबचं स्वप्न पूर्ण …शिवसेना संपली असं ट्विट त्यांनी केलं आहे.
“संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविका आघाडीचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आता राजकीय हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. आपल्या आमदारांनासह अपक्ष आमदारांना भाजपने सागर बंगल्यावर बोलवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
आदरणीय पवार साहेब यांचं स्वप्न पूर्ण …
शिवसेना संपली … ?— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 22, 2022
Read also:
- उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
- आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
- एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन
- शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर