मुंबई : राज्यात अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय भूमिका मांडली, तसेच त्यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ सोडून पुन्हा भाजपसोबत येऊन सरकार स्थापन करावं अशी मागणी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच नाव जाहीर; शरद पवारांच्या उपस्थित झाली बैठक
ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, मी येत्या 24 तासात इतका वाईट झालो का? मला लगेचच गटनेता पदावरून का काढण्यात आलं? याचं पहिल्यांदा उत्तर द्या. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबईत येण्याचं सांगतिलं.
“शिवसेनेच्या काही आमदारांचा खुन देखील होऊ शकतो”; संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य
तुम्हाला भाजपसोबत यावं लागेल, ही पक्षाच्या हिताची गोष्ट असून त्यांचं तुम्ही मला आश्वासन द्या. त्याचसोबत मला मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, परंतु तुम्ही राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ सोडा आणि हिंदुत्वाची वाट धरा. ही माझी मागणी नसून माझ्यासोबत असणाऱ्या सगळ्या आमदारांची मागणी आहे. असं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई, गटनेता पदावरून हाकालपट्टी
दरम्यान, वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? आणि परत भाजप आणि शिवसेनेचे युतीचे दरवाजे उघडणार का ? याची माहिती आता थोड्याच वेळाने समजणार आहे.
Read also:
- “संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा
- “उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
- आघाडीचं सरकार कोसळणार भाजपचे आमदार गोव्यात, तर काॅंग्रेसचे आमदार मुंबईत दाखल
- एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप; दुसरीकडे अजित पवारांचा भाजपाला दे धक्का
- एकनाथ शिंदेंचं सुरतमधील ठिकाण बदलणार; 3 चार्टर विमानं 14 फॉर्च्युनर गाड्या तयार