मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर विधान परिषदेमधील गटनेते पदावरून त्यांना हटवून अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. मात्र गटनेते पदासाठी आवश्यक 35 आमदार आमच्याकडे असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गटनेते पदावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये एकनाथ शिंदे यांचं ठिकाण बदलण्यात येत असल्याची माहिती आहे.
“एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न,शिवसेनेशी लवकरच चर्चा करणार”
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांना आता सुरतमधील मरेडियन या हॉटेलमधून हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी 3 चार्टर विमानं, आणि 14 फॉर्च्युनर गाड्यांचा ताफा तयार ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील एकनाथ शिंदे यांची भेट अहमदाबाद येथे घेणार आहेत. अशी सुत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर त्यांना त्याठिकाणांवरून गांधीनगरला देखील हलवण्यात येणार आहेत. एकनाथ शिंदे हे आज सायंकाळ पर्यंत पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत.
“सत्ता येते जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही;” राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तसेच त्यांची गटनेता पदावरून देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्याकडून मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सुरत मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीत काय निर्णय होणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Read also:
- राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच नाव जाहीर; शरद पवारांच्या उपस्थित झाली बैठक
- “शिवसेनेच्या काही आमदारांचा खुन देखील होऊ शकतो”; संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य
- एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई, गटनेता पदावरून हाकालपट्टी
- “बाळासाहेबांची अन् दिघे साहेबांची शिकवण, आम्ही सत्तेसाठी..” एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
- एकनाथ शिंदें यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपचे अध्यक्ष नड्डा अन् अमित शहांशी भेट घेणार