मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. तर कॉंग्रेसच्या आमदारांना देखील बैठकीसाठी दिल्लीत बोलवले आहेत. तसेच शिवसेनेच्या आमदारांशी बैठक वर्षा या निवासस्थानी बोलवण्यात आली आहे. तर शरद पवार हे आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सत्ता येते जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही;” राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
शिवसेनेच्या अनेक आमदारांनी सुरतमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर भाजपने दहशतीसारखे खुनी हल्ले झाल्याची माहिती आली आहे. यामधील काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधून कळवलं आहे की आमच्या जिवाला धोका आहे. यामध्ये आमचा खुन देखील होऊ शकतो. अशा प्रकाराचे वातावरण कशासाठी तयार केले जात आहे. हे काही समजत नाही. परंतु यामधून शिवसेना बाहेर पडेल.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेसह एकूण 35 आमदार; वाचा संपुर्ण यादी
शिवसेनेचे संघटन यामधून परत एकदा उभे राहिल. संध्याकाळी शिवसैनिकांची राजकीय बैठक पार पडणार आहे. त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल. एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेच्या गटनेता पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्याजागी अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी त्याचबरोबर मित्र असुन त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांसोबत काम केले आहेत. त्यांच्या मनात काही गैरसमज झाले असतील तर ते दुर होऊ शकतात.
“शाब्बास एकनाथजी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
एकनाथ शिंदे हे एकनिष्ठ शिवसैनिक असून त्यांचं आयुष्य शिवसेनेत गेले आहे. शिवसेनेच्या अनेक संघर्षातमध्ये शिवसेनेत राहिले आहेत. त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एकनिष्ठ श्रद्धा आहे. त्यामुळे ते धोका देखील असं मला वाटत नाही. असंही राऊतांनी म्हटले आहे. राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत असताना आजच अनिल परब यांना इडीची नोटीस का पाठवली? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई, गटनेता पदावरून हाकालपट्टी
- “बाळासाहेबांची अन् दिघे साहेबांची शिकवण, आम्ही सत्तेसाठी..” एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
- एकनाथ शिंदें यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपचे अध्यक्ष नड्डा अन् अमित शहांशी भेट घेणार
- “एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न,शिवसेनेशी लवकरच चर्चा करणार”
- फडणवीसांना मुख्यमंत्री पद, शिंदेना उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची साथ नकोच; एकनाथ शिंदेनी घातल्या अटी