मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 26 आमदार सुरतमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून आता मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.
देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी! गोपीचंद पडळकर यांचा आरोप
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज ट्विट केलं आहे. त्यात मशिदीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. त्यात असं म्हटलं आहे की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. सरकार येत जाते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
काॅंग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान, निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार?
एकनाथ शिंदे सेनेला भाजपसोबत जाण्याची अट घालण्याची शक्यता आहे. जर शिवसेना भाजपसोबत गेली तर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेसोबतच राहण्याची शक्यता आहे. दुसरी अट म्हणजे एकनाथ शिंदे हा स्वत: चा पक्ष काढून भाजपला पाठिंबा देऊ शकतो. मात्र जर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिले तर एकनाथ शिंदे भाजपसोबत जाण्यास तयार होतील. राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक वर्षा येथे बोलवण्यात आली आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत दाखल झाले असून काॅंग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत बोलवण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मोठे नेते सुरतमध्ये दाखल होणार आहेत.
आघाडीतील 21 मतं फुटली कोणी बाजी मारली, कोणाची रणनिती फेल ठरली
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचं सांगण्यात येत होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबरोबर बंडखोरी केली असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे आज पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात. त्यावर राज्यातील सरकार निर्भर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची आता महत्वाची भूमिका राहिली आहे.
Read also:
- एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेसह एकूण 35 आमदार; वाचा संपुर्ण यादी
- “शाब्बास एकनाथजी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
- “एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे सर्व आमदार संपर्कात, भाजपचा डाव यशस्वी होणार नाही”
- आघाडीत मोठा भुकंप; एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल
- राष्ट्रवादीची पहिल्या पंसतीची मते निंबाळकर यांना, खडसेंना दुसऱ्या पसंतीची मते